सोलापूर: सोलापुरातील शांतता
रॅलीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत, चौघांच्या गळ्यातील तीन लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन चोरून नेल्या. ही चोरी ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान झाली.
जुना पुना नाका येथून शांतता रॅली निघणार होती, त्यासाठी हजारो लोक छत्रपती संभाजी महाराज चौकात जमा झाले होते. गणपती मंदिराजवळ गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी प्रकाश बलभीम डांगे (वय ५५ रा. सिंधू विहार) यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची शिवाजी महाराजांचे पेंडलसह असलेली चेन चोरून नेली. दरम्यान विश्वास सुखदेव पवार यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची चेन नेली. अमोल दिगंबर जगताप यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची चैन चोरून नेली. तर सिद्धेश्वर दतू यांच्याही गळ्यातील दोन तोळ्यांची ६० हजारांची चेन चोरून नेली. या प्रकरणी प्रकाश डांगे यांनी फिर्याद दिली आहे.