सोलापूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य
गुरुवारी शहरातील चार पोलिस चौक्या सुरू करण्यात आल्या. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
मरीआई पोलिस चौकी, सम्राट पोलिस चौकी, घरकुल पोलिस चौकी, नई जिंदगी पोलिस चौकी अशा सुरु करण्यात आल्या चार पोलिस चौकांचा समावेश आहे. सुरू करण्यात आलेल्या या पोलिस चौकीमध्ये कोणतेही शासकीय कामकाज चालणार नाही, फिर्याद घेणे, जबाब नोंदवणे, तक्रारी अर्ज घेणे अशी कामे फक्त संबंधित पोलिस ठाण्यातच चालतील, असे पोलिस आयुक्त एम.
राजकुमार यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. पोलिस चौकी येथे स्टाफ फक्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व पोलिसांची उपस्थिती नागरिकांना दिसावी यासाठीच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शहरातील पोलिस चौक्या सुरू व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्तालयांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.
याची दखल घेऊन पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. शहरवासीयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.